Responsive Image

दृष्टिकोन, उद्देश आणि ध्येय

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बदल घडून तो सक्षम करणे, तसेच व्यक्तिगत आणि सामाजिक उन्नती साधने ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. समृद्ध सामाजिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या आमच्या शैक्षणिक संस्थेचा उद्देश फक्त अध्ययन आणि अध्यापन नसून, नेतृत्वगुण विकसित करणे हा देखील आहे. मानसिक आणि सांस्कृतिक संगोपन करून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक प्रगती आणि सामाजिक योगदानाची कौशल्ये विकसित करणे हा आमचा दृष्टिकोन आहे. सकारात्मक बदलासाठी उत्प्रेरकाची भूमिका बजावणे, तसेच दुर्गम,ग्रामीण भागात सेवा पुरविणे हीच आमची मोहीम आहे, आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

ग्रामीण आणि दुर्बल घटकापर्यंत शिक्षण पोहचविणे
मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आधुनिक ज्ञानाने सज्ज करणे.
उज्जल भविष्यासाठी अत्यावशक अशी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे.
विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती विकसित करून विविध खेळातील खेळाडू तयार करणे.
विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक आणि सांस्कृतिक कौशल्ये विकसित करणे.
इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देणे.
स्पर्धा परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणे.
राष्ट्रीय मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे.
१० सामाजिक जाणीव असलेला, संवेदनशील, प्रामाणिक आणि देशभक्त नागरिक घडविणे.
Copyright ©2024 All Rights Reserved | Designed and Developed By Biyani Technologies Pvt Ltd